
आगामी यश आणि साई पल्लवी अभिनिती रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटातील कलाकारांपासून ते हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार इथपर्यंत लोक आता विचारत आहेत. या चित्रपटाबद्दल आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये प्रसिद्ध मराठी सिनेस्टार महेश कोठारेंचा मुलगा आणि मराठी स्टार आदिनाथ कोठारे हा झळकणार आहे.
आदिनाथ कोठारे हा मराठी हुरहुन्नरी कलाकार आहेच, पण त्याने आतापर्यंत अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे तो बालकलाकारही आहे. त्याची माझा छकुला या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारेंबरोबरची भूमिका लक्षात राहण्यासारखी आहे
रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी अभिनीत 'रामायण' चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटात मराठी कलाकार झळकणार म्हटल्यावर आता आणखीनच या चित्रपटाबद्दल रसिकांना आस्था वाटत आहे. खास बाब म्हणजे मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे या चित्रपटात भगवान रामाचा भाऊ भरतची भूमिका साकारणार आहे. त्याने स्वतः या चित्रपटात आपण असल्याचे स्पष्ट केले आहे. आदिनाथ कोठारेला मुख्य सहकलाकाराची भूमिका मिळणार आहे.
आदिनाथ कोठारे 'रामायण'मध्ये भरत हे महत्त्वाचे पात्र साकारणार आहे. भरत हे भगवान रामाचा धाकटा भाऊ असून, तो नेहमीच आपल्या मोठ्या भावाच्या आदर्शांचे पालन करतो. हे कथेतील एक भावनिक आणि मजबूत पात्र आहे.
रामायण चित्रपटाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणाला की, 'रामायण' हा केवळ एक चित्रपट नसून, ती भारतातील सर्वात मोठ्या कथांपैकी एक आहे आणि त्याचा भाग असणे हे त्याच्यासाठी एक मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे मला मिळालेल्या संधीचे सोने करणार आहे.