सावंतवाडी : तु चाल पुढं, देवमाणुस 2, च्या माध्यमातुन मराठी माणसांच्या घराघरात आणि मनामनात असणा-या कोकणची अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरनं आज कोकणचं नंबर वन महाचॅनेल कोकणसाद LIVE ला भेट दिली. कोकणसाद LIVE चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांनी तिचं सन्मानचिन्ह देवून स्वागत केलं. यावेळी साईप्रसाद कल्याणकर, पत्रकार निलेश मोरजकर, कोकणसाद लाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के, उपसंपादक प्रा. रूपेश पाटील, अॅंकर जुईली पांगम, विनायक गावस आदी उपस्थित होते.
आपल्या अतिशय प्रभावी अभिनयानं रसिकांची मने जिंकणारी कोकणातली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर. तु चाल पुढं, देवमाणुस 2 यामधुन रसिकांची मने जिंकल्यानंतर आता तिचा पहिलाच मराठी चित्रपट येतोय तो म्हणजे बांबु. येत्या 26 तारखेला हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं वैष्णवीनं कोकणसाद लाईव्हच्या स्टुडीओत मनमोकळया गप्पा मारल्या. कॉमेडी, लव्ह स्टोरी, सस्पेन्स अशा सर्वच बाबींचा एकत्रित समावेश असलेला हा चित्रपट सर्व कोकणवासीयांनी अवश्य पहावा, असं आवाहनही तिनं केलं.