अभिनेते विवेक लागू यांचे निधन

Edited by: ब्‍युरो
Published on: June 20, 2025 14:56 PM
views 151  views

ज्येष्ठ मराठी अभिनेते-दिग्दर्शक विवेक लागू यांचे गुरुवारी (१९ जून २०२५ रोजी) निधन झाले. ते दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. विवेक लागू यांनी मराठी आणि हिंदी अभिनयविश्वात खूप काम केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विवेक लागू यांचे अंत्यसंस्कार आज मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत होणार आहेत.

आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या विवेक लागू यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर चाहते व राजकीय नेते, तसेच कलाविश्वातील सेलिब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. विवेक यांची लेक मृण्मयी लागूनेदेखील पोस्ट शेअर केली आहे. मंत्री आशिष शेलार यांनीही विवेक यांना श्रद्धांजली वाहिली.