आशिये कणकवली येथे सोमवारी स्वर-तालाची अनोखी मैफल !

गंधर्व फाउंडेशन, कणकवलीचा उपक्रम !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 30, 2022 17:06 PM
views 270  views

 कणकवली : येथील आशीये दत्तमंदिर येथे आज शास्त्रीय गायन व एकल तबला वादनाचा कार्यक्रम गंधर्व तर्फे आयोजित करण्यात आला आहे. गंधर्व गेले अनेक वर्षे नवनवीन सांगीतिक उपक्रम आयोजित करत असून रसिकांचाही या उपक्रमांना उदंड प्रतिसाद लाभला आहे. करोंना काळातील निर्बंधामुळे स्थगित झालेले सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा सुरु होत आहेत. याच पार्श्वभूमीवर नित्यनूतन या नव्या उपक्रमातून गंधर्वच्या सांगीतिक कार्यक्रमांना सुरुवात होत आहे.

आजच्या कार्यक्रमात मुंबई येथील गानतपस्वी धोंडुताई कुलकर्णी यांच्या शिष्या सौ. पूजा आठवले-बाक्रे यांचे शास्त्रीय गायन व तबला गुरु पं. योगेश सम्सी यांचे शिष्य स्वप्नील भिसे यांचे सोलो तबला वादन होणार आहे. त्यांना संवादिनी साथ अनुक्रमे प्रसाद शेवडे व सौ. प्रियांका भिसे करणार आहेत. मुंबईच्या संगीत चळवळीतील अग्रगण्य अशा अभिजात म्युझिक फोरम या संस्थेच्या सहकार्याने हि मैफल जुळून आली आहे.  ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता आशिये दत्तमंदिर येथे होणाऱ्या या नित्यनूतन उपक्रमास सर्व संगीत प्रेमींनी आवर्जून उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन गंधर्वचे अध्यक्ष अभय खडपकर यांनी केले आहे.