सावंतवाडी : श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग पाचव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त निसर्ग, चंद्र व चांदणे या संकल्पनेवर आधारित "हे चांदणे फुलांनी..." जुन्या - नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा व नृत्याविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.७ नोव्हेंबरला सायंकाळी ठीक ५:३० वा. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी येथे ही मैफिल रंगणार आहे.
हा कार्यक्रम सद्गुरु संगीत विद्यालयाच्या कु वर्षा देवण, ॲड सिद्धी परब, कु समृद्धी सावंत, कु मधुरा खानोलकर, कु केतकी सावंत, कु गौरांगी सावंत, सौ अनामिका मेस्त्री, सौ पूजा दळवी, श्री नितिन धामापूरकर, कु भास्कर मेस्त्री, कु सर्वेश राऊळ, सौ मानसी वझे, कु अंकुश आजगांवकर, कु स्मिता गावडे, कु प्रगती मिशाळ, कु चिन्मयी मेस्त्री, कु श्रिया म्हालटकर, कु तन्वी दळवी, कु वैष्णवी गावडे, कु लतिका नाईक, कु वैष्णवी वाडकर. हे विद्यार्थी सदर कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाला साथसंगत श्री निलेश मेस्त्री व कु. मंगेश मेस्त्री (हार्मोनियम) , श्री किशोर सावंत व कु निरज मिलिंद भोसले (तबला) , कु शुभम सुतार (ढोलक/ढोलकी) , श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), श्री बालकृष्ण मेस्त (सिंथेसायझर) व सूत्रसंचालन श्री संजय कात्रे व सौ उमा तिळवे तर ध्वनी संयोजन श्री सुभाष शिरोडकर करणार आहेत. गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होणार आहे.
तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी, सद्गुरु संगीत विद्यालय, पालकवर्ग व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.