मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. मल्ल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिचा वयाच्या २४ व्या मृत्यू झाला आहे.
मल्ल्याळम अभिनेत्री लक्ष्मीका सजीवन हिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.लक्ष्मीकाला मृत्यू हृदयविकाराच्या झटका आल्यानं तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. संयुक्त अरब अमिरातील शारजाह इथं तिचं निधन झालं आहे. काही कामानिमित्त लक्ष्मीका बॅंकेत गेली होती. तिथंच तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
लक्ष्मीका सजीवन हिच्या सिनेक्षेत्रातल्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 'कक्का' या मल्ल्याळम शॉर्ट फिल्ममधून लक्ष्मीकाला ओळख मिळाली होती. या शॉर्टफिल्ममधील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. 'नित्यहरिथा नायगन' 'पुढायम्मा', 'ओरू यमंदन प्रेमकथा' 'पंचवर्णथा', 'सौदी वेलाक्का', 'उयारे', 'ओरू कुटनादन ब्लॉग' यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली होती. 'कून' हा तिचा शेवटचा सिनेमा ठरला.
कामाचा तणाव, व्यसन आणि कामाचे वाढलेले तास यामुळं दिवसेंदिवस तरुणवयात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. गेल्या काही वर्षात सिनेइडंस्ट्रीतही अनेक तरुण कलाकारांचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यानं झालं. आता अवघ्या २४ वर्षीय अभिनेला हृदयविकाराचा झटका आल्यानं तिचा मृत्यू झालाय.