'कांतारा'च्‍या शुटिंगवेळी मोठी दुर्घटना, अभिनेता ऋषभ शेट्टीसह ३० क्रू मेंबर्स थोडक्‍यात बचावले

शिवमोगा जिल्ह्यातील मस्ती कट्टे परिसरातील तलावात बोट पलटली
Edited by:
Published on: June 16, 2025 13:46 PM
views 99  views

कन्नड चित्रपट 'कंतारा: चॅप्‍टर 1' च्‍या चित्रीकरणादरम्यान बोट जलाशयात पलटली. ही दुर्घटना शिवमोग्गा जिल्ह्यातील मस्ती कट्टे परिसरातील मणी तलावात चित्रीकरणादरम्यान घडली. अभिनेता ऋषभ शेट्टीसह ३० क्रू मेंबर्स थोडक्‍यात बचावले, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.

या दुर्घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कन्नड चित्रपट 'कंतारा: चॅप्‍टर 1 च्‍या चित्रीकरण शिवमोगा जिल्ह्यातील मस्ती कट्टे परिसरातील मणि तलावात सुरु होते. तलावाच्या उथळ भागात बोट पलटली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी आणि ३० क्रू मेंबर्स या अपघातातून सुखरूप बचावले आहेत. कॅमेर आणि अन्‍य साहित्‍य पाण्‍यात बुडल्‍याचे सांगण्‍यात येत आहे. आर्थिक नुकसानीबाबत अद्याप कोणतीही माहिती निर्मात्‍यांनी दिलेली नहाी. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.