BIG BREAKING ; देशात CAA कायदा लागू !

Edited by: ब्युरो
Published on: March 11, 2024 12:49 PM
views 574  views

ब्युरो : नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA बाबत मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय नागरिकत्व सुधारणा कायद्याचे CAAनियम अधिसूचित केले आहेत. पीएम मोदी आणि गृहमंत्री अमित शाह 2019 पासून सीएए लागू करण्यासाठी आग्रही भूमिका मांडत आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 10 फेब्रुवारी रोजी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत CAAमोठी घोषणा केली होती. दरम्यान, आता सीएएच्या अंमलबजावणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.