
कणकवली : कणकवली नगरपंचायत हद्दीतील सि.स.नं. १७३७, वॉर्ड क्र. ३ मधील घर क्र. ४९ हे बाधित असूनही त्याचे डिमॉलिशन करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ, कणकवली येथील आत्माराम रमाकांत राणे यांनी मंगळवारी उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत प्रत्यक्ष कारवाई होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा राणे यांनी घेतला आहे. यावेळी कणकवली शहराचे नवनिर्वाचित नगरसेवक राकेश राणे यांनी आत्माराम राणे यांनी भेट घेतली व महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची चर्चा केली व त्वरित बाधित घर हटवण्याचे आदेश काढावेत असे सांगितले.










