दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय राम भरोसे

नर्सिंग क्वार्टरला गळती
Edited by: लवू परब
Published on: July 12, 2024 12:12 PM
views 136  views

दोडामार्ग :   दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाची आज परिस्थिती पाहिली तर दोडामार्ग आरोग्य विभागाला कुणीच वाली नसल्याचे चित्र आज दिसून आले. येथील नर्स कॉटर मध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.औषध साठा स्टोअर रूमलाही गळती लागली आहे. एकंदरीत परिस्थिती पाहिली ते दोडामार्ग आरोग्य विभागाचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे.

आज कोकणसाद दोडामार्ग टीमने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली असता येथील आरोग्य यंत्रणा, अपुरा स्टाफ, गळती लागलेली इमारत, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर नाही अस्वच्छता या सर्व गोष्टी निदर्शनास आल्या. येथील प्रभारी डॉ अनिकेत गुरव यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाकडे कोणाचा ही लक्ष नसल्याने त्यांनीही नाराजी व्यक्त केली. तसेच अपुरा स्टाफ भरण्याचीही त्यांनी प्रेसच्या माध्यमातून मागणी केली आहे.

 

नर्सिंग कॉटरला गळती

भेट घेतल्या दरम्यान निदर्शनास आले की नर्सेस ज्या ठिकाणी बसून आपलं कामाकाज करतात त्या नर्सिंग कॉटरलाच गळती लागली आहे. त्यामुळे येथील औषधे, तसेच आतील दप्तरलाही पाणी लागून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तर एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी गळती आहे त्या ठीकाणी विद्युत उपकरणे आहेत आणि याला पाणी लागून शॉर्टसर्किट होऊन जीवित हानीही होऊ शकते.


अपुरा स्टाफ

एकंदरीत पाहिलं असता येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये 15 च्या वर अधिकारी वं कर्मचारी यांचा स्टाफ कमी आहे वैद्यकीय अधीक्षक एकही मंजूर नाही, वैद्यकीय अधिकारी एकूण दोन पदे मंजूर आहेत मात्र हे दोन्ही पदे रिक्त आहेत, दंत शल्य चिकित्सक एक पद मंजूर आहे मात्र तेही कार्यरत नाही, परिचारिका एकूण सहा पदे मंजूर आहेत त्यातील पाच पदे कार्यरत आहेत आणि एक पद रिक्त आहे, क्षकिरण-तंत्रज्ञ एक पद मंजूर आहे व तेही रिक्त आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक पद मंजूर आहे मात्र तेही रिक्त आहे, औषध निर्माता अधिकारी एक पद मंजूर आहे पण तेही रिक्त आहे, सहाय्यक अधीक्षक एक पद मंजूर आहे मात्र तेही रिक्त आहे, कनिष्ठ लिपिक हे एक पद मंजूर असून ते रिक्त आहे, लिपिक टंकलेखक एक पद मंजूर असून तेही रिक्त आहे, वाहन चालक हे एक पद मंजूर असून तेही रिक्त आहे, सफाई कर्मचारी दोन पदे मंजूर असून तेही रिक्त आहेत. अशा प्रकारे हे दोडामार्ग ग्रामीण रुग्णाल अधिकारी कर्मचाऱ्यांविना चालविले जात आहेत.


 टक्केवारीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली : बाबूराव धुरी

शिवसेना उबाठा उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्याशी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयासंदर्भात बातचीत केली असता ते म्हणाले की महाविकास आघाडीचे सरकार असताना 60 लाख रुपयांचा भरून निधी मंजूर करण्यात आला होता. ग्रामीण रुग्णालयाची डागडूजी करण्यासाठी करण्यात येणारे काम संबंधित ठेकेदाराकडून काहीनी टक्केवारी घेतल्याने त्या ठिकाणी करण्यात आलेले काम बसविणे आलेल्या फरश्या फुटून पडू लागल्या आहेत. त्यामुळे याची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळा यादीत टाकावे असेही धुरी म्हणाले. येते काही दिवसात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावतीने स्वतः पैसे काढून या ठिकाणी फुटलेल्या फरश्या दुरुस्त करण्यात येतील असेही बरोबर यांनी स्पष्ट केले आहे.


 सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : डॉ अनिकेत गुरव

 दरम्यान डॉ अनिकेत गुरव यांची भेट घेतली असता ते म्हणाले की या सर्व विषयावर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागला तसा पत्रव्यवहार केला आहे. मात्र या सर्व व्यवहाराकडे  सार्वजनिक बांधकाम विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे  असे ते म्हणाले, अपुरा स्टाफ हा भरण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर ही पत्र व्यवहार केलेला आहे. मात्र प्रत्यक्षात काहीच होत नसल्याचे ते म्हणाले.


 स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरच नाही

डॉ ज्ञानेश्वर ऐवाळे यांची बदली झाल्यानंतर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दोन वर्षापासून एकही स्त्री रोग तज्ञ डॉक्टर कायमस्वरूपी आले नाहीत. या ठिकाणी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील एकाही महिलेची या ठिकाणी प्रसुती झाली नाही. ही मोठी दुर्दैवी बाब आहे. तालुक्यात ग्रामीण रुग्णालय असताना देखील  येथील रुग्णांना लगतच्या गोवा राज्य त आरोग्याच्या विषयी जावे लागत आहे मग अशी परिस्थिती असताना करोडो रुपये खर्च करून उपजिल्हा रुग्णालय दर्जाची इमारत या ठिकाणी बांधली जात आहे भविष्यात त्याचा काय उपयोग होणार? की अशीच परिस्थिती राहणार असे म्हणणं वावग ठरणार नाही.