
वेंगुर्ले : सध्या शेतीच्या बाबतीत तंत्रज्ञान विकसित होऊन आधुनिकीकरण झाले आहे. कोकण कृषी विद्यापीठाने शेती करत असताना जे मार्ग सुचवलेले असतील त्याचे जे प्रमाण दिले आहे त्या पद्धतीने त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे. जर याचे अतिप्रमाण झाल्यास त्याचे धोके खूप आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी लोक सेंद्रिय शेती, भाजीपाला याकडे वळायला लागली आहेत. यात वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी शेती करावी असे आवाहन वेंगुर्ले गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी वेंगुर्ले येथे केले.
पंचायत समिती वेंगुर्ला, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत अणसूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज १ जुलै रोजी अणसूर-पाल हायस्कूल, अणसूर येथील सभागृहात कृषि दिन कार्यक्रम आयोजित करणेत आला होता. यावेळी नाईक बोलत होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शेतकरी व वारकरी यांच्या पेहरावात काढलेल्या वृक्षदिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच हळद लागवड प्रात्यक्षिक करण्यात आले..
यानंतर गावातील स्थानिक महिलांनी केलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते फित कापून झाले. पुढील मुख्य कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित प्रमुख मान्यवर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, मंडळ कृषी अधिकारी शंकर नाईक, अणसूर सरपंच सत्यविजय गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, आरवली सरपंच समीर कांबळी, आसोली सरपंच बाळा जाधव, मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांच्या हस्ते हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर अणसुर-पाल विकास मंडळ मुंबई अध्यक्ष आत्माराम गावडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद उर्फ बिटू गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष हरिश्चंद्र गावडे, अणसुर उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रा प सदस्य वामन गावडे, सुधाकर गावडे, सीमा गावडे, संयमी गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, ग्रामपंचायत अधिकाती डी बी पवार, पाल उपसरपंच प्रीती गावडे, आसोली उपसरपंच संकेत धुरी यांच्यासहित पंचायत समिती कृषी विभाग, प्रभाकर गावडे, सुनील गावडे, सीआरपी शिला देवूलकर, बहर संघ मानसी आंगचेकर, पशु सखी सुषमा गावडे, रुचिता गावडे, तालुका कृषी विभागचे अधिकारी कर्मचारी, विविध ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी, अणसुर- पाल हायस्कुलचे शिक्षक, कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, महिला वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सुपारीचे रोप देऊन करण्यात आले.
अणसुर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर व अणसुर-पाल हायस्कुलचे मुख्याध्यापक राजेश घाटवळ यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या भातपीक स्पर्धेत प्रथम आलेल्या वेतोरे येथील सुशांत मोहन नाईक, द्वितीय तळेकरवाडी येथील अश्विनकुमार रमाकांत मांजरेकर व तृतीय अणसुर येथील प्रमोद शांताराम गावडे यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अणसुर गावातील प्रगतशील शेतकरी आंबा बागायतदार बाबू जयराम गावडे यांचा व गांडूळ खत निर्मिती करून विक्री करणाऱ्या तसेच शेतीविषयक विविध उपक्रम राबवणाऱ्या गावातील माऊली उत्पादक समूह गट अणसुर या कृषी उत्पादक गटाचा आणि रानभाज्या प्रदर्शनात सहभागी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर प्रदेशीक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लाचे काजू शात्रज्ञ डॉ. ललित खापरे, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक धनंजय गोळम, जिल्हा संसाधनच्या श्रेया सामंत, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आनंद जानकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती कृषी अधिकारी प्रशांत चव्हाण यांनी तर मान्यवरांचे स्वागत अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, कृषी विस्तार अधिकारी सखाराम सावंत, सुप्रिया कोरगावकर यांनी केले.