
वैभववाडी : करूळ जामदारवाडी येथील भास्कर रामचंद्र सरफरे (वय-७९)या वृध्द शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यातून वाहून मृत्यू झाला.त्यांचा मृतदेह करूळ नदीपात्रात आढळुन आला. हा प्रकार आज सकाळी घडला.त्यांचा मृतदेह दुपारी सापडला.
करूळ जामदारवाडी येथील शेतकरी भास्कर सरफरे हे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घरातुन शेतात गेले.त्यांची शेतजमीन नदीच्या पलीकडे आहे.नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहुन गेले.सकाळी अकरा वाजेपर्यत ते शेतातुन आले नसल्यामुळे घरातील मंडळीनी त्याचा शोध सुरू केला.परंतु ते शेतात देखील आढळुन आले नाहीत.त्यामुळे नदीपात्रात त्याचा शोध घेण्यात आला असता त्यांचा मृतदेह दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आढळुन आला.
ही माहीती पोलीसांना दिल्यानतंर पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर,पोलीस कर्मचारी अजय बिलपे,उध्दव साबळे,महिला पोलीस योगिता जाधव,हे घटनास्थळी पोहोचले.त्यांनी स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रातील मृतदेह बाहेर काढला.शवविच्छेदनानतंर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्यात दोन मुलगे असा परिवार आहे.