LIVE UPDATES

माहिती हक्क कायद्याचे सखोल विश्लेषण आता मराठीतून

माजी माहिती आयुक्त संजय ढवळीकर लिखित पुस्तकाचे शुक्रवारी गोव्यात प्रकाशन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 07:24 PM
views 37  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

पणजी : गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाच्या आयोजनातून लेखक व गोव्याचे माजी राज्य माहिती आयुक्त संजय नारायण ढवळीकर यांच्या ‘माहिती हक्क कायदा : परिचय आणि विश्लेषण’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ३.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. पणजी येथील कला व संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एनआरआय आयुक्त अॅड. नरेंद्र सावईकर उपस्थित राहणार आहेत. तर सन्माननीय अतिथी म्हणून गोवा सरकारचे शिक्षण व राजभाषा सचिव प्रसाद लोलयेकर (आयएएस) उपस्थित राहतील.

माहितीचा अधिकार हा नागरिकांना पारदर्शक प्रशासन आणि शासकीय कामकाजाची माहिती मिळवून देणारा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याची ओळख, त्यातील तरतुदी आणि त्याचे विश्लेषण मराठी भाषेतून वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित होत आहे.या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचे संचालक विवेक कृ. नाईक आणि पुस्तकाचे लेखक संजय ना. ढवळीकर यांनी केले आहे.