सिंधुदुर्गनगरी : 2 ऑक्टोबर 2024 रोजी क्रीडा संकुल या ठिकाणी 17 वर्षाखालील मुलांची खो-खो स्पर्धा संपन्न झाली. अंतिम फेरी गाठण्यासाठी तीन लढती झाल्या या प्रत्येक लढतीत न्यू इंग्लिश स्कूल ओरोस या संघाने एक डाव राखून जेतेपद मिळवले व या संघाची विभाग स्तरावर निवड झाली आहे.
गेली तीन वर्षे न्यू इंग्लिश स्कूल ओरोस विभाग स्तरावरती आपलं प्रतिनिधित्व करत आहे. अतिम सामन्यात सम्यक रमेश पेंडूरकर या विद्यार्थ्याने पाच मिनिटाच्या डावांमध्ये एकट्याने चार मिनिटे खेळ खेळून विजय खेचून आणला आणि जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक एस एस सावंत तसेच प्रशिक्षक मंदार गोसावी याचेही प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक रायबान, शिक्षक वर्ग तसेच धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसालचे संस्था अध्यक्ष व सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.