कणकवलीत महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' स्पर्धा

नगरपंचायत - कनकसिंधू संघ यांचं आयोजन | महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काच्या बाजारपेठेसाठी प्रयत्न करणार : सुशांत नाईक
Edited by: उमेश बुचडे
Published on: March 17, 2026 13:55 PM
views 16  views

कणकवली :  कणकवली नगरपंचायत, दीनदयाळ जन आजीविका योजना (शहरी) आणि कनकसिंधू शहर स्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि क्रांतीदूत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कणकवली नगरपंचायतचे उपनगराध्यकक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

आजच्या जीवनातून महिलांनी स्वतःसाठी थोडा वेळ काढून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अशा प्रकारचे उपक्रम राबवणे हे खरोखरच कौतुकास्पद असून, शहरातील बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची आणि उत्तम बाजारपेठ मिळावी यासाठी आम्ही नगरपंचायत मार्फत सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका जाई मुरकर, सुमेधा अंधारी, दिपीका जाधव, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, मेघा गांगण, मेघा सावंत, आर्या राणे, नगरसेवक राधाकृष्ण नार्वेकर, लुकेश कांबळे, संकेत नाईक, सत्यजित पारकर आणि नगरपंचायत सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले आदी उपस्थित होते.

यावेळी आयोजित 'खेळ पैठणीचा' या अटीतटीच्या स्पर्धेत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये रसिका साटम हिने प्रथम क्रमांक पटकावून मानाची पैठणी जिंकली. द्वितीय क्रमांक आयेशा कांबळे तर तृतीय क्रमांक साक्षी चव्हाण हिने मिळवला. ​लकी ड्रॉ आणि प्रश्नमंजुष ​कार्यक्रमात केवळ खेळच नव्हे तर बौद्धिक कौशल्यालाही वाव देण्यात आला. ​लकी ड्रॉ मध्ये स्वाती टकले, अन्वी सरूडकर, अश्वीता आचरेकर यांनी पटकावला. तर ​प्रश्नमंजुषा स्पर्धेत सारीका गारंग, सुनीता पांचाळ, दिव्या कदम, हेमांगी चव्हाण, सानिका सावंत, सिमा सावंत, नूतन दळवी, दिव्या साळगावकर आणि शीतल खटावकर यांनी बक्षिसे पटकावली. ​कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन समीर चराटकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनकसिंधू शहर स्तर संघाच्या अध्यक्षा प्रिया सरुडकर, उपाध्यक्ष रंजिता परब, सचिव शुभांगी उबाळे, सहसचिव विशाखा कांबळे, खजिनदार दिव्या साळगावकर आणि सदस्य सुचिता पालव, स्वाती राणे, स्वाती गोखले, ज्योती रावराणे, मयुरी सरंगले, नीलम कोरगावकर तसेच CLC व्यवस्थापक सिद्धी नलावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.