
वेंगुर्ला: सिंधदुदूर्ग जिल्हा शासकिय निमशासकिय सह.बॅक या बॅकेवर संचालक पदी अजय नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व शासकिय, निमशासकिय विभागातील अधिकारी /कर्मचारी सभासद समाविष्ठ करणारी ही सिंधुदूर्ग जिल्हयातील संस्था आहे. सन-2025-2026 ते सन 2030-2031 करीता अजय नाईक यांची बिनविरोध निवड करणेत आली. अजय नाईक हे सध्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात पंचायत समिती वेंगुर्ले येथे वरिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत.