
सावंतवाडी : शिरशिंगे गावातील मळईवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला संदिप गावडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी शिरशिंगे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच कटिबद्ध राहील, असे आश्वासन दिले.
१ मे रोजी मनोहर मनसंतोष गडाच्या पायथ्याशी असलेल्या मळई वाडी येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. या सोहळ्याला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संदिप गावडे यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या विचारांचे महत्त्व विशद केले.
संदिप गावडे म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने आणि नीतिमत्तेने समाजाला एक नवी दिशा दिली. त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. शिरशिंगे गावाच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रयत्नशील राहील. गावातील मूलभूत सुविधा सुधारणे यावर आमचा भर राहील."