
सावंतवाडी : भालावल गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार ९ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम सकाळी १० वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता महाआरती व तिर्थप्रसाद, दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता स्थानिक ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गुणगौरव कार्यक्रम, रात्री ९:३० वाजता महाराष्ट्राची गौरव गाथा मुंबईतील मराठी ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी सातेरी मित्र मंडळ मुंबई, युवाशक्ती मित्रमंडळ, भालावल प्रीमियर लीग मित्रमंडळ, श्री देवी सातेरी देवस्थान कमिटी व देवस्थान मानकरी यांनी केले आहे.