विशाल चौहान याला गुंडा कायद्याखाली अटक...!

Edited by:
Published on: June 10, 2024 12:51 PM
views 388  views

बेळगाव : खूनासारखे गंभीर गुन्हे तसेच खंडणीसाठी अपहरण आणि इतर अनेक गुन्हे केलेल्या अत्यंत कुख्यात गुंड विशाल सिंह चौहान याला पोलिसांनी अटक केली आहे . तसेच त्याच्या विरुद्ध गुंडा ॲक्ट खाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुंड विशाल सिंह चौहान (वय 25, मूळ रा. चिक्कनंदीहळ्ळी ता कित्तूर, सध्या रा. कदम बिल्डिंग शास्त्रीनगर बेळगाव) याच्या विरुद्ध एक खून, 5 खुनाचे प्रयत्न, एक शस्त्र कायदा भंग प्रकरण, एक पैशासाठी अपहरणाचे प्रकरण, 2 वेळा तडीपार आदेशाचे उल्लंघन, महाराष्ट्रात खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र कायदा भंगाची 2 प्रकरणे, गोवा राज्यात चोरीचे एक प्रकरण या पद्धतीने एकूण 14 प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

तडीपार आदेशाचे उल्लंघन करून विशाल सिंग याने पैशासाठी एकाचे अपहरण केले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास कार्य हाती घेतले होते.