दोडामार्ग जि.प., पं.स. भाजपा विजयी उमेदवारांनी विशाल परब यांची घेतली सदिच्छा भेट

Edited by: लवू परब
Published on: February 10, 2026 22:13 PM
views 107  views

दोडामार्ग : आताच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दोडामार्गात भाजप शिवसेना महायुतीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. या निमित्त आज मंगळवारी भाजपाचे युवा नेते विशाल परब यांची सर्व उमेदवारांनी सावंतवाडी येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सर्व उमेदवारांचे विशाल परब यांनी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले.

      जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख व माटणे जि.प मध्ये भरघोस मतांनी विजयी झालेले रामा उर्फ दीपक गवस तसेच मणेरी मतदार संघ, साटेली भेडशी मतदार संघ या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले या बद्दल सर्व विजयी उमेदवारांचे विशाल परब यांनी अभिनंदन केले. यावेळी दोडामार्ग पदाधिकारी व विजयी उमेदवार बोलताना म्हणाले की, विशाल परब जेव्हा जेव्हा दोडामार्गात येतात तेव्हा तेव्हा दोडामार्गमध्ये परिवर्तन होत आणि आज ते जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झाले आहे. त्याबद्दल सर्वांनी विशाल परब यांचे आभार मानले. यावेळी विजयी उमेदवार रामा उर्फ दीपक गवस, संजय सातार्डेकर, अंकुश उर्फ भैया नाईक, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, आनंद तळणकर, रंगनाथ गवस, देवा शेटकर, शिरीष नाईक आदी उपस्थित होते.