पालकमंत्री नितेश राणे बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 10, 2026 21:59 PM
views 11  views

सिंधुदुर्गनगरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8.20 वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा, गोवा येथे आगमन व मोटारीने पिंगुळी ता.कुडाळकडे प्रयाण.  सकाळी  10 वाजता "बाणेश्वर पेट्रोलियम" या नवीन पेट्रोल पंपाच्या उद्घाटनास उपस्थिती. स्थळ :- पिंगुळी – टेंबधुरीनगर, मुंबई गोवा महामार्ग, ता. कुडाळ. सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सभेस उपस्थिती. स्थळ:- जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. दुपारी 1 वाजता देवगड तालुक्यातील मौज कुणकेश्वर श्री देव स्वयंभू देवाचा वार्षिक जत्रोत्सव 2026, आढावा बैठक. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग. दुपारी 2 वाजता मोटारीने गोव्याकडे प्रयाण.