शेखर निकम यांच्या सुपुत्राची ऑस्ट्रेलियामध्ये मास्टर्स पूर्ण

Edited by: मनोज पवार
Published on: December 05, 2024 21:24 PM
views 390  views

चिपळूण :  सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखरजी निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध याने नुकतेच (ऑगस्ट २०२४) आपले पदव्युतर शिक्षण, "मास्टर्स इन ॲग्रीकल्चरल सायन्स इन द फिल्ड ऑफ हॉर्टीकल्चर "हे युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड, ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया येथून पूर्ण केले. हा पदवी प्रदान सोहळा ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया येथे पार पडला. चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम कुटुंबीय यासाठी उपस्थित होते. 

अनिरुद्ध याने ब्रिस्बेन येथील युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड येथे जूलै २०२२ पासुन ऑस्ट्रेलियन एग्रीकल्चर डिपार्टमेंट आणि हॉर्ट इनोवेशन यांच्या सोबत “ॲव्होकाडो फ्रुट रोबोस्टनेस ॲण्ड व्हॅल्यू चेन-इनिशिएटीव्ह बाय क्यूूडिएएफ  ऑस्ट्रेलियन ॲव्होकॅडोज, ह्वॉर्ट इनोव्हेशन ( "Avocado Fruit Robustness and Value Chain-Initiative by QDAF, Australian Avocados, Hort Innovation ”) या प्रोजेक्ट वर काम केले, त्याचे हे काम “AV21005” या प्रोजेक्ट ख़ाली पूढ़ील वर्षी ऑस्ट्रेलिया गवर्नमेंट च्या पुस्तिकेमध्ये प्रकाशित होणार आहे. 

या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधी बरोबर त्याने अनेक लीडरशिप उपक्रम, त्याचबरोबर संशोधन कॉन्फ़ेरेंस, इतर शैक्षणिक आणि संशोधन कार्यांची एकूणच कार्यक्षमता याच्या अवलोकनानंतर, यूनिवर्सिटी ऑफ़ क्वींसलैंडच्या अकादमिक आणि वीसी कमिटी ने त्याला या वर्षीचा *“Dean’s Commendation Award for Academic Excellence-2024”* हा जाहीर केला, व तो देण्यात आला. यावेळी आमदार शेखर निकम, सौ. पुजाताई निकम व कुटुंबीय हजर होते.

   आमदार शेखर निकम हे स्वतः कृषि पदविधर (Master in Plant Pathology) असल्याने अनिरुद्ध च्या या सर्व वाटचालीस त्यांचे मोलाचे योगदान आहे.      आज ब्रिसबेन, ऑस्ट्रेलिया येथे पदवी प्रदान सोहळ्यामध्ये अनिरुद्ध याला पदवी प्रदान करण्यात आली. कृषी व औद्योगिक क्षेत्रात पुढे काम करणार असल्याचे अनिरुद्ध याने यावेळी सांगितले. आमदार शेखर निकम व कुटुंबियांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.