
सावंतवाडी : शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर (जि. प. प्रा. पीएम श्री शाळा सावंतवाडी नं. २) या प्रशालेचा 'किलबिल' वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५:३० वाजता प्रशालेच्या प्रांगणात हा सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे.
या स्नेहसंमेलनासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचे सभापती आणि नगरसेविकांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, नियोजन व पर्यावरण सभापती मोतीराम नेवगी, आणि उद्यान व पर्यटन सभापती सौ. शर्वरी मडगांवकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच नगरसेविका सौ. दुलारी रांगणेकर, सौ. शर्वरी धारगळकर, ॲड. सौ. सायली दुभाषी यांचीही विशेष उपस्थिती असेल.शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर म्हणून सावंतवाडीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. सविता परव आणि केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. 'किलबिल' या नावाने होणाऱ्या या स्नेहसंमेलनात शाळेतील चिमुकल्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर होणार आहेत. विद्यार्थी प्रतिनिधी कु. सानवी देसाई आणि कु. आराध्य आपटे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद आणि शालेय समित्या या सोहळ्याच्या तयारीसाठी मेहनत घेत आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा सांस्कृतिक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ आणि पालक शिक्षक संघ यांच्या वतीने केलं आहे










