GOA || सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पुरुष अधिक ; पण मोठा पगार महिलांचाच !

सरकारी कर्मचारी सर्वेक्षण अहवाल : मोठा पगार घेणाऱ्यांमध्ये पुरुष ८,१५४ तर १४,०१० महिला
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 07, 2022 15:09 PM
views 227  views

पणजी : राज्यातील सरकारी कामचुकार कर्मचाऱ्यांना सक्तीने निवृत्त करण्याचा आदेश जारी केल्यानंतर, याविषयी राज्यभरात खळबळ उडाली आहे. सरकारी नोकऱ्यासंदर्भातील विविध मुद्दे समोर येत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पुरुषांची संख्या जास्त असली तरी अधिक वेतन घेणाऱ्यांमध्ये १४,०१० महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सरकारने केलेल्या सरकारी कर्मचारी सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

राज्यात एकूण ६३,००० सरकारी कर्मचारी असून त्यांतील पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या ३९,६८४ म्हणजे सुमारे ६३ टक्के, तर महिला कर्मचाऱ्यांची संख्या २३,४७९ म्हणजे सुमारे ३७ टक्के आहे. दरम्यान, अधिक वेतन घेणाऱ्यांमध्ये १४,०१० म्हणजेच २२ टक्के महिला कर्मचारी, तर ८,१५४ म्हणजे सुमारे ५ टक्के पुरुष कर्मचारी आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांचे संख्याबळ जास्त असले तरी मोठ्या पगाराचा घास मात्र महिलावर्गाकडेच आहे.

सध्या राज्यात सरकारी खाती, अनुदानित संस्था व स्वायत्त संस्था या तीन विभागांत मोठा पगार घेणाऱ्या महिला आहेत. सरकारी खात्यांमध्ये ४,२००-५,४०० या वेतन श्रेणीमध्ये ४,६६७ महिला, तर ३,७४८ पुरुष कर्मचारी आहेत. ५,४००-७,६०० या वेतन श्रेणीमध्ये ३९ महिला, तर ३२ पुरुष कर्मचारी आहेत. ८,०००-१०,००० या वेतन श्रेणीमध्ये ५६ महिला, तर ४५ पुरुष कर्मचारी आहेत. १०,०००हून अधिकच्या वेतन श्रेणीमध्ये १,२९२ महिला, तर १,०५९ पुरुष कर्मचारी आहेत.

अनुदानित संस्थांमध्ये २,४०० या वेतन श्रेणीमध्ये ३४० महिला, तर ३३५ पुरुष कर्मचारी आहेत. ४,२००-४,८०० या वेतन श्रेणीमध्ये ५,७७७ महिला, तर १,६८७ पुरुष कर्मचारी आहेत. ५,४००-७,००० या वेतन श्रेणीमध्ये ४१७ महिला, तर ३५१ पुरुष कर्मचारी आहेत. ८,०००-९,००० या वेतन श्रेणीमध्ये १६७ महिला, तर ११५ पुरुष कर्मचारी आहेत. १०,००० हून अधिकच्या वेतन श्रेणीत १,२२८ महिला, तर ७६५ पुरुष कर्मचारी आहेत.

स्वायत्त संस्थामध्ये २,४०० या वेतन श्रेणीमध्ये १३ महिला, तर ११ पुरुष कर्मचारी आहेत. ४,२००-५,४०० या वेतन श्रेणीमध्ये १० महिला, तर ६ पुरुष कर्मचारी आहेत. ५,४००-७,६०० या वेतन श्रेणीमध्ये २ महिला, तर ० पुरुष कर्मचारी आहेत. १०,००० हून अधिकच्या वेतन श्रेणीमध्ये २ महिला, तर ० पुरुष कर्मचारी आहेत.