
सिंधुदुर्गनगरी : कोकण महसुली विभाग, राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त बलदेव सिंह हे दि. २७ व २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. दिनांक २८ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या आढावा बैठका पार पडणार आहेत. दुपारच्या सत्रात जिल्हा मुख्यालयातील स्थानिक कार्यालयांना भेटी देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची तपासणी करणार आहेत. यामध्ये जिल्हा सेतू कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व स्वस्त रेशन धान्य दुकान येथे भेटी देणार आहेत.
दिनांक २९ ऑक्टोबर रोजी गांव पातळीवरील कार्यालयांना भेटी देणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील विविध ग्राम पंचायत कार्यालय, प्रादेशिक बंदर अधिकारी वेंगुर्ला-मालवण, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, मालवण नगर परिषद, विविध स्वस्त रेशन धान्य दुकान, आपले सरकार सेवा केंद्राला भेट देणार आहेत.










