जयदीप आपटेचा जामीन अर्ज फेटाळला

राजकोट किल्ला पुतळा दुर्घटना प्रकरण
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 01, 2024 13:46 PM
views 231  views

सिंधुदुर्गनगरी : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे यांनी आपल्याला जामीन मिळावा यासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला होता. यावर मंगळवारी सुनावणी होऊन हा अर्ज प्रमुक जिल्हा व सत्र न्यायाधीश एच बी गायकवाड यांनी नामंजूर केला आहे.

 पुतळा उभारते वेळी ज्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक होते त्या गोष्टींची काळजी घेतली गेली नाही. त्याचबरोबर या पुतळा उभारणीमध्ये वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे निकृष्ट दर्जाचे होते. आदि युक्तिवाद सरकारी वकील यांनी केला हा युक्तीवाद ग्राह्य  मानत न्यायालयाने जयदीप आपटे यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे. याप्रकरणी या कामी सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी आणि सहाय्यक सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.