
सावंतवाडी : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये मुळ सावंतवाडीच्या असणाऱ्या नार्वेकर कुटुंबान मोठं यश प्राप्त केले आहे. विधानसभा अध्यक्ष तथा आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा भागात भाजप महायुतीने घवघवीत यश संपादित केल आहे.
भाजप महायुतीच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी अभिनंदन केले आहे.
हा कौल म्हणजे काम, निर्णयक्षमता आणि जबाबदारी यांवर जनतेने व्यक्त केलेला ठाम विश्वास असून योग्य उमेदवारांना संधी देत सक्षम नेतृत्व उभे करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र भाजपाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनास सलाम करत कुलाबा भागातील नागरी विकास, पायाभूत सुविधा आणि प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर समन्वयाने प्रभावी काम करण्यासाठी सर्वांसोबत मिळून पुढे जाऊ असा विश्वास स्थानिक आमदार ॲड. नार्वेकर यांनी व्यक्त केला. यावेळी विजयी उमेदवार रिटा मकवाना, आकाश राजपुरोहित, हर्षिता नार्वेकर, ॲड. मकरंद नार्वेकर, डॉ. गौरवी शिवलकर नार्वेकर उपस्थित होते.














