
कणकवली : पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या प्रयत्नातून दारिस्ते गडनदी पात्रातील गाळ उपसा कामाचा शुभारंभ नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य गोट्या सावंत यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले, या नदीपात्रातील गाळामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी गुरव वाडी वस्तीत घुसत असल्याने मोठा धोका निर्माण होत असे, उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी पुरवठा होत नसल्याने लोकाचे खूप हाल होत असत, पण आता या पुढे नदीतील गाळ काढल्यामुळे गुरववाडी वस्तीचे संरक्षण होईल आणि उन्हाळ्यात पाणी साठा वाढेल त्यामुळे गुरववाडी, सुतार वाडी, पटेलवाडी या तीन वाडीतील लोकांना या गाळ उपसाचा बराचसा फायदा होणार आहे त्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री नितेशजी राणे व गोट्या सावंत यांचे मनापासून आभार मानले व या पुढे दारिस्ते गावातील जनता नितेशजी राणे आणि गोट्या सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल ! या वेळी दारिस्ते सरपंच सानिका गांवकर उपसरपंच संजय सावंत सुरेश गांवकर गोपी सुतार पोलीस पाटील हेमंत सावंत संजय गांवकर, तात्या गुरव, ग्रा सदस्य भाई सावंत वैष्णवी सुतार वृषाली कदम, नेहा सावंत, दाजी शेलार भाऊ सावंत विनायक गुरव बाबी साळसकर जीतू सावंत केशव सुतार गणेश गुरव मदन गुरव सुरेश गुरव चेतन गुरव भरत गुरव भरत दारिस्तेकर वासुदेव कदम महेश सुतार दशरथ लाड बळीराम गुरव तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या योजनेचा दारिस्ते गावातील लोकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेशजी राणे आणि गोट्या सावंत यांचे मनापासून आभार मानले आहेत.










