
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसोबत स्थानिक रोजगारनिर्मिती व आर्थिक विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने ५ स्टार हॉटेल उभारण्याबाबतचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पाला गती द्यावी, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी तसेच उच्च दर्जाच्या पर्यटन सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे, सिस्टुला ट्यूलिप पीएलसीचे अध्यक्ष माइक बेरी, संचालक अमित कामत आदी उपस्थित होते.
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रकल्पाच्या प्रलंबित बाबींवर सखोल चर्चा करून प्रकल्प लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटनविकास उपक्रमांबाबत सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेऊन त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंबंधी चर्चा झाली.ताजी बातमी
View all

विशेष सखोल पुनरीक्षणासह विविध योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
October 23, 2026

बांबर्डेतील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू
October 23, 2026

जिल्हास्तरीय कराओके गायन स्पर्धेत जयेश जाधव प्रथम
October 22, 2026

पालक सचिव वीरेंद्र सिंह उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर
October 22, 2026
संबंधित बातम्या
View all

मनोज जरांगे पाटलांनी फोडला 'ऑडिओ' बॉम्ब
October 22, 2026

गोकुळच्या चेअरमनपदाची निवड २९ ऑक्टोबरला
October 21, 2026

Gokul Election Results : गोकुळच्या सत्तासंग्रामात सतेज पाटील वरचढ
October 19, 2026

Legal Child Adoption Process in India : बालकांचे हक्क व सुरक्षिततेसाठी कायदेशीर दत्तक प्रक्रिया आवश्यक
October 19, 2026




