मुंबई : ठाणे, शिवाई नगर येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य सिताराम राणे यांनी कोकण ग्राम विकास मंडळाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मालवणी महोत्सव - २०२५ या कार्यक्रमाला केंद्रीय माजी मंत्री व कोकणचे दबंग नेते, खासदार नारायण राणे यांनी उपस्थित दर्शवली. सिताराम राणे यांनी कोकण आणि मराठी माणसांसाठी आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत त्यांना खास शुभेच्छा दिल्या.
ठाणे स्थित कोकणचे सुपुत्र सीताराम राणे हे गेली २६ वर्षे शिवाईनगर येथे मालवणी महोत्सव आयोजित करत आहेत. भाजपा नेते राणे कुटुंबियांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. या महोत्सवला ते आवर्जून उपस्थिती दर्शवितात. या मालवणी महोत्सवात कोकण वासियांबरोबरच मालवणी माणसांना कोकणी खाद्य संस्कृती, पारंपरिक नृत्य, लोककला आदी कलाविष्कारांचा मनसोक्त आस्वाद घेता येतो.
यावेळी ही शानदार आयोजित या महोत्सवला नारायण राणे यांनी आवर्जून उपस्थित राहत सिताराम राणे व त्यांच्या सहकाऱ्यांचे खास अभिनंदन केलं. यावेळी त्यांचे समवेत आमदार निरंजन डावखरे, सिताराम राणे व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांसह मालवणी लोक मोठया संख्येने उपस्थित होते.