
सावंतवाडी : उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. सावंतवाडी व वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी प्रभागनिहाय स्थिती, प्रचाराचा वेग आणि नागरिकांचा प्रतिसाद याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
या चर्चेदरम्यान संजू परब यांनी दोन्ही नगरपालिकात ‘भगव्या’च राज्य येईल असा विश्वास व्यक्त करत “सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगरपरिषदांवर भगवा फडकवून दोन्ही ठिकाणी आमचेच नगराध्यक्ष बसवणार,” असा शब्द उपमुख्यमंत्री शिंदे यांना दिला. उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या या थेट संवादामुळे संजू परब यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे














