CM डॉ. प्रमोद सावंतांनी घेतलं श्री देवी कुलस्वामिनीचं दर्शन !

Edited by: संदीप देसाई
Published on: November 30, 2023 11:57 AM
views 323  views

सावंतवाडी : कुणकेरी येथे कुलदेवता दर्शनासाठी आलेल्या गोव्याचे सीएम डॉ. प्रमोद सावंत यांचं श्री देवी भावई कुणकेरी स्थानिक सल्लागार उपसमितीने स्वागत केलं. त्यानंतर सीएमनी घेतली सावंत - भोसले परिवाराच्या श्री कुलस्वामिनी देवीचे दर्शन घेतले. 

यावेळी सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, सावंतवाडी संस्थांनचे राजे खेमसावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, बीकेसी अध्यक्ष अच्युत सावंतभोसले, राजू राऊळ, बंड्या सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. येथे समस्त सावंत भोसले परिवार व सावंत - भोसले श्री कुलस्वामींनी प्रतिष्ठान मुंबईच्यावतीनं देवघरातील मानकरी प्रकाश सावंत - भोसले, कुणकेरी गावचे माजी सावंतवाडी सभापती प्रमोद सावंत, सरपंच सोनिया सावंत, आंबेगाव सरपंच शिवाजी परब आदी उपस्थित होते.