'कोकण पदवीधर'च्या मतदानाच्या वेळेत बदल

Edited by: ब्युरो
Published on: June 13, 2024 08:13 AM
views 558  views

सिंधुदुर्गनगरी : कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीसाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आलाय.  माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी याबाबतची माहिती दिली.                                                   


निवडणुकीकरीता मतदानाची वेळ सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० पर्यंत निश्चित करण्यात आलेली होती. परंतु भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला असून मतदानाची सुधारित वेळ सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत निश्चित केलेली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.