जगातील सर्वात मोठे आंब्याचे पान..!

Edited by:
Published on: January 15, 2024 12:58 PM
views 533  views

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती व बागायतदार श्री चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर कुडाळ यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान ठरले जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान आणि श्री चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर ठरले जागतिक रेकॉर्ड होल्डर. 

निसर्गात अशा बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात पण त्या प्रकाशात आणणे महत्त्वाचे असते. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी व नंतर अकाउंट व्यवस्थापक म्हणून सुमारे 32 वर्ष सेवा करून निवृत्त झाल्यानंतर आपली आंबा व काजू बागायतीची आवड जोपासत असताना श्री काजरेकर यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या साहाय्याने  जागतिक रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपल्या मुली डॉ नालंदा परब व डॉ नुपूर अगरवाडकर  आणि जावई श्री धीरज परब व डॉ देवेन अगरवाडकर यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स , वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला. त्यानंतर पुनर्रतपासणीचे रेकॉर्ड  तयार करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे  तत्कालीन प्राचार्य डॉ श्री विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र  विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ श्री रवींद्र यशवंत ठाकूर, प्राध्यापक श्री उमेश मिलिंद कामत व प्राध्यापक श्री दयानंद विश्वनाथ ठाकूर  यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. या कामात  डॉ दिपाली काजरेकर, डॉ नालंदा , डॉ नुपूर  व जावई श्री धीरज, डॉ देवेन  तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओ ची टीम यांचे सहकार्य लाभले.

व जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे जागिनिस वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद श्री चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे  झाली व कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले. या पानाची लांबी *55.6* सेंमी व रुंदी *15.6* सेंमी आहे. यापूर्वी  प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत नवनवीन प्रयोग केले. कुडाळ येथील आपल्या  राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर शेकडो सुपार्‍या व काजूची रोपे तयार करून  नर्सरी चा यशस्वी प्रयोग केला. तसेच तळवडे सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू श्री विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साहाय्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधीची लागवड व संवर्धन  यांचेही यशस्वी प्रयोग केले आहेत.