
कुडाळ : शिवसेनेच्या मागासवर्गीय तालुका प्रमुखपदी निजवे गावचे सुपुत्र विजय जाधव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाधव यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निलेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करून, निजवे गावातून मोठा विजय मिळवून देण्यात विजय जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या धडाडीच्या कामामुळेच त्यांना ही नवी जबाबदारी मिळाली आहे.
या नियुक्तीबद्दल बोलताना विजय जाधव म्हणाले, "पक्ष नेतृत्वाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला मी नक्कीच पात्र ठरेल आणि पक्षाचे काम अधिक जोमाने पुढे नेईन."