OXYGEN TOURISUM | ..ही आहेत 'ऑक्सिजन'ची झाडं !

फिरायला जाल तेव्हा नक्की 'फील' करा !
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: January 30, 2023 18:51 PM
views 381  views

कोविडनंतर ऑक्सिजनचे महत्व पुनः अधोरेखित झाले. त्यामुळे आता पर्यटनाचीही व्याख्या बदलली आहे. आज खाद्यपदार्थ, मौजमजा यासोबत जिथ शुद्ध आणि भरपूर ऑक्सिजन आहे, अशा ठिकाणांची निवड केली जाते. पृथ्वीवर ऑक्सीजनचा चांगला आणि एकमेव स्त्रोत म्हणजे झाडे मानली जातात. आपण त्या झाडांविषयी जाणून घेवूयात जी सर्वात जास्त ऑक्सिजन तयार करतात. 


सर्वसाधारणपणे झाडे दिवसा ऑक्सिजन आणि रात्री कार्बनडायऑक्साईड सोडतात. पिंपळाचे हे एकमेव असे झाड आहे जे पूर्ण २४ तास ऑक्सिजन देते. प्राचीन काळापासून या झाडाची पूजा केली जाते. तथागत गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, यामुळे याला बोधिवृक्षही म्हणतात. या व्यतिरिक्त या झाडांची पाने औषधी गुणांनी भरलेली आहेत. 




अशोक वृक्ष संपूर्ण भारतीय उपखंडात आढळतात. विविध प्रकारच्या आजाराला हे झाड उपयोगी असून, ते निरनिराळ्या आजाराचा नायनाट करते. सर्वात जास्त ऑक्सिजन सोडणाऱ्या झाडांमध्ये अशोकाच्या झाडाचाही समावेश होतो. त्यामुळे ही झाडे आपल्याला जास्त करुन घर किंवा कार्यालयासमोर, विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात. अक्षय्य म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे. वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही. ते कायम वाढतच राहते. वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात ऑक्सिजन वातावरणात सोडत असते. भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते. वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात. 



बांबूचे झाड सर्वात लवकर वाढणारे झाड आहे. बांबूचे झाड हवा फ्रेश करण्यासाठीही फायदेशीर ठरते. इतर झाडांच्या तुलनेत बांबूचे झाड ३० टक्के अधिक प्रमाणात ऑक्सिजन तयार करते. प्रदूषणमुक्त हवा देणाऱ्या तुळशीचे झाड प्रत्येक ठिकाणी लावणे गरजेचे असते. प्रदूषणाचा स्तर साधारण ३० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात तुळस मदत करते. वनस्पती शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार तुळस ही दिवसातले वीस तास ऑक्सिजन तर उर्वरित चार तास कार्बन डायाॅक्साईड हवेत सोडते. कडुनिंब या वृक्षात त्याच्या परिसरातील हवा शुद्ध आणि आरोग्यपूर्ण राखण्याचे सामर्थ्य आहे. या वृक्षाला वर्षभर पाने असतात म्हणून त्याला सदपर्णी वृक्ष असेही म्हणतात. या झाडाचे पान, फळ, फुल, साल, खोड आणि काडया सर्व काही औषधी आहेत.



उंबराचे झाड हे झाड खूप मोठे असते. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. उंबराचे झाड हे हवा शुद्ध करते. तसेच या झाडाच्या सावलीत गारवा व शांतता मिळते. या झाडांसोबतच जांभळाचे झाड, चिंचेचे झाड, आंबा, बकुळ, जास्वंद, सीताफळ, निवडुंगाचे, पेरू आदी झाडे हि आपल्यासाठी जीवनदायी वृक्ष आहेत.