लाखो भाविकांच्या अतिशय श्रद्धेचे स्थान व पांडवकालीन जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या मेढे ता. दोडामार्ग येथिल श्री नागनाथ मंदिर तीर्थक्षेत्र याठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर गोवा, कर्नाटक, बेळगाव व कोल्हापूर येथिल भाविकही या जागृत देवस्थानाच्या ठिकाणी महाशिवरात्री दिवस मोठ्या संख्येने गर्दी करतात. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव नागनाथच्या मंदिर जीर्णद्धाराचा मोठा संकल्प पुणे यावर्षी तेरवण मेढे वासियांनी सोडला आहे. त्याच पासून पन्नास वर्षांपूर्वी पांडवकालीन गाभाऱ्यावर ग्रामवासियांनी बांधणी केलेले मंदिर पूर्णतः खाली केले असून यावर्षी प्रथमच नागनाथच्या लाखो भाविकांना पांडवकालीन बांधकामाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येणार आहे.
गोवा - दोडामार्ग- बेळगाव या मुख्य रस्त्यापासून मेढे येथे फक्त १ कि.मी अंतरावर श्री नागनाथ मंदिर येथे वसलेले आहे. या प्रसिद्ध तिर्थक्षेत्राबाबत येथिल जाणकार अशी माहिती देतात की, फार वर्षापूर्वी ज्या ठिकाणी आताचे नागनाथ मंदिर व तिर्थ तळी आहे. त्या ठिकाणी घनदाट असे जंगल हे मुख्य गावापासून फक्त अर्धा-एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या जंगलात मेढे येथिल ग्रामस्थांच्या गाई- म्हैशी चरण्यास परतल्या. मात्र या जंगलात सोडण्यात येणाऱ्या एका ग्रामस्थांच्या नियमीत दुध देणाऱ्या एका गाईने अचानक दुध देणे बंद केले. त्यावेळी तो ग्रामस्थ चक्रावून गेला. नियमीत दुध देणाऱ्या गाईने अचानक दुध देणे बंद का केले ? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. त्यामुळे त्या ग्रामस्थाने त्या गाईवर पारक ठेवून त्याचा शोध घेण्याचे ठरविले आणि त्या दिवसापासून तो ग्रामस्थ त्या गायीवर पारक ठेवून राहिला. त्यावेळी त्याला असे आढळून आले की, ती घरी दूध न देणारी गाय या जंगलातच एका बारुळाच्या ठिकाणी दुध सोडे आणि एकदाच नाही तर ती गाय वारंवार याच ठिकाणी दुध सोड याचा पुन्हा त्या ग्रामस्थाने शोध घेतला. त्यावेळी त्याला त्या ठिकाणी नागपिंडी आढळून आली आणि अशाप्रकारे या ठिकाणी स्वयंभू शिवलिंग प्रकट झाल्याची आख्यायिका येथील जाणकार सांगतात. त्यापुढे हा चमत्कार व त्या शिवलिंगाबाबत अज्ञातवासात असणाऱ्या पांडवांना ती गोष्ट कळली तेव्हा पांडवांनी त्या ठिकाणी मंदिर बसविण्याचे निश्चित केले. एका रात्रीत हे मंदिर त्यांना बसवायचे होते आणि अशा एका रात्रीत या मंदिराची निर्मिती पाडवांनी केली.
या बाबतही येथील जाणकार असे सांगतात की, अज्ञातवासात असताना पांडवांनी एक रात्र या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी निवासस्थान केले. त्यावेळी कोंबडा आरवण्यापूर्वी या मंदिराचे पूर्ण बांधकाम करायचे होते. त्यासाठी त्यांनी त्या आपल्या दैवशक्तीद्वारे याच ठिकणी भोजनाच्या व्यवस्थेसाठी त्याच रात्री वायंगण तयार करुन भात पिक तयार केले व भोजन व्यवस्था केली, भोजन होईपर्यंत थोडीशी विश्रांती घेण्याचे ठरविले व पहाटे पुन्हा या मंदिराचे अपूर्ण काम पूर्ण करायचे ठरविले. त्यासाठी पांडवांनी आपल्याला उठवण्याची कामगिरी त्यांच्या सोबत असणाऱ्या नंदिला (नंदिबैल) दिली. मात्र कोंबडा आरवला तरीही नंदिने पांडवांना उठविलेच नाही. त्यामुळे क्रोधीत झालेल्या पांडवांपैकी भिमाने नंदिला शिक्षा करण्यासाठी त्याच्यावर जोरात लाथ मारली व त्याला मंदिरालगत अर्थात आताच्या स्वयंभू शिवलिंगालगत असणाऱ्या पाण्याच्या आताच्या स्नान तळीत तिर्थक्षेत्रात फेकून दिले. त्याच तळीत आज महाशिवरात्री व श्रावणात आणि सोमवारी हजारो भाविक स्थान करतात. त्या तळीत पूर्णतः पाण्याखाली असलेल्या नंदिची शिलारुपी प्रतिमा आहे. तसेच शिवलिंगा समोरही नंदिची अर्धवट प्रतिमा आहे. अशा प्रकारे पांडवकालीन देवस्थान व मंदिराची निर्मिती झाल्याचे तेथील जाणकारी ग्रामस्थ व तेथील सल्लागार उपसमितीचे सदस्य सांगत अशा या पांडवकालीन व स्वयंभू शिवलींग नागनाथ मंदिरात प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात व वातावरणात शिवरात्र उत्सव साजरा केला जातो. स्वयंभू शिवलींग व श्री नागनाथ तिर्थक्षेत्र हे हमखास न पावणारे व भाविकांचे श्रद्धेचे स्थान आहे. म्हणूनच या प्रसिद्ध जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री देव नागनाथ ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलींगाच्या दर्शनासाठी व तिर्थक्षेत्रात स्नान करण्यासाठी सिंधुदुर्ग मधूनच नव्हे तर कर्नाटक, बेळगाव, कोल्हापूर या भागातून हजारो भाविक गर्दी करतात.
या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी महाशिवरात्रौत्सवादिवशी प्रशासनाकडून एस्.टी गाड्या चंदगड व सावंतवाडी या डेपोतून सोडण्यात येतात. त्याच बरोबर येथील उत्सव सुरळीत पाडण्यासाठी तालुका प्रशासकीय यंत्रणा कार्यरत असतात. महाशिवरात्रौत्सव म्हणजे समस्त मेढेवासियांसाठी एक पर्वणीच असते. दिवशी हजारा भाविक श्री नागनाथ तिर्थक्षेत्र या ठिकाणी जी तिर्थ तळी आहे ज्या तळीत महाशिवरात्री स्नान करतात. त्या तळीत बाराही महिने पाणी जितके आहे तीतकेच असते हे विशेष. या प्रसिद्ध तिर्थक्षेत्रावरील स्वयंभू शिवलींगावर हजारो कळशा ओतण्यात येणारे पाणी कुठे जाते याचे गुढ अध्यापही कायम आहे. महाशिवरात्री, श्रावणी सोमवार येथील शिवलींगावर हजारो कळशा पाणी सोडले जाते. मात्र हे पाणी आजपर्यंत कोठे जाते व कसे जाते हे कोणालाही समजले नाही. तेथील ग्रामस्थ यात श्री नागनाथाची कृपा शक्ती समजतात.
या मंदिराच्या शेजारी असलेल्या तळीला कुठेही झरे दिसत नाहीत. तरीही तळीतील पाणी उन्हाळ्यात कमी होत नाही की पावसाळ्यात वाढत नाही. पाण्याची पातळी वर्षाचे बारा महिने कायम राहते. महाशिवरात्री दिवशी या तळीत हजारो भाविक स्नान करतात. मोठ्या तळीला लागून लहान आकाराची लहान तळी आहे. या तळीला देवाची तळी म्हणतात. देवाच्या अभिषेकासाठी याच तळीचे पाणी वापरले जाते. श्री देव नागनाथ हे जागृत देवस्थान आहे. तो भक्ताची तात्काळ मनोकामना पूर्ण करतो, अशी ख्याती आहे.
येथे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी उत्सव होतो. मोठी जत्रा भरते. गोवा, कोकण, कर्नाटक व पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रातून हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने येथे यात्रेला येतात. जत्रेदिवशी नाट्यप्रयोग असतो. नाटक पहाटे चार वाजेपर्यंत चालते. त्यानंतर देव पूजा होऊन पवित्र स्नानास प्रारंभ होतो. तळीत स्नान करून भाविक मंदिरात येतात. अविरत घंटानादाच्या गजरात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात. कापूर, अगरबत्ती जाळतात. यावेळी भक्तांना श्री देव नागनाथाचे प्रत्यक्ष नागाच्या रुपात दर्शन घडते. त्यानंतर भाविक तृप्त मनाने परतीच्या मार्गाला लागतात.
ही समिती करते यात्रा नियोजन..
देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर - यांचे अधिपत्याखालील देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, तेरवणमेढे
1. श्री. देवू तुकाराम गवस- अध्यक्ष
२. श्री.रामकृष्ण चेनु गवस- उपाध्यक्ष
३. श्री. मनोहर अर्जुन गवस - सचिव
४. श्री.जयराज तुकाराम गवस-सह सचिव
५. श्री. प्रदिप शांताराम गवस- खजिनदार
६. श्री. भरत सखाराम गवस- सदस्य
७. श्री. सखाराम सोनू सडेकर - सदस्य
८. श्री. वामन गोंविद गवस - सदस्य
९. श्री. अर्जुन लक्ष्मण नाईक-सदस्य
१०. श्री. गवस
११. श्री. नाईक
१२. श्री. दत्ताराम गंगाराम कांबळे-सदस्य
१३ श्री. सिताराम सुभाष कांबळे-सदस्य
ही मंडळी येथील वर्षभरात होणारे सण उत्सव व यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी व भाविकांच्या सोयीसाठी अहोरात्र मेहनत घेत असते.
55 वर्षांनी होणार श्री देव नागनाथ मंदिराचा जीर्णोद्धार
आताच्या देवस्थान कमिटीने ग्रामवासीय व श्री देव नागनाथच्या हजारो भाविकांच्या सहकार्याने 2020 मध्ये मंदिर जीर्णोद्धार संकल्प सोडला होता. पण कोरोना कालामुले दोन वर्ष गेली यावर्षी मात्र कमिटीने हजारो भाविकांच्या मनातील सुसज्ज श्री देव नागनाथ मंदिर संकल्प सिद्धीस नेण्यासाठी जोरदार नियोजन केलं. त्याच पार्शवभूमीवर देवता आशीर्वाद घेऊन ग्रामवासिय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांना सोबत घेत 55 वर्षांपूर्वी बांधणी केलेलं मंदिर पांडव कालीन गाभारा वगळता खाली केलं आहे. संपूर्ण छप्पर आणि गाभारा वगळता अन्य बांधकाम काढण्यात आल्याने यावर्षी जत्रोत्सवाच्या निमित्तानं पांडवकालीन गाभारचे संपूर्ण दर्शन भक्तगणांना याची देही याची डोळा पहावयाला मिळणार आहे. येत्या गुढी पाढव्या पासून मंदिर जिर्णोद्धार शुभ मुहूर्त करून श्री देव नागनाथ च्या भव्य मंदिर उभारणीला सूरवात होणार असून या पवित्र कार्यासाठी भाविक व नागरिक यांनी सडळ हस्ते आर्थिक मदत करावी अशी हाक देवस्थान कमिटीने दिली आहे .
यापूर्वी या पांडवकालीन गाभाऱ्यावर 1967-68 मध्ये मंदिर बांधणी झाली होती. त्यावेळची जीर्णोद्धार समिती नाथ बुडकुले, आर.बी.राणे, आर.जी.देसाई, पुंडलिक लक्ष्मण गवस, सखाराम तुकाराम गवस, कृष्णा आपा गवस व गंगाधर टोपले या समितीनं ग्रामवसियांच्या सोबतीन उभारणी केली होती. मेढे, तेरेवण आणि इसापूर या गावातून प्रत्येकी 500 रुपये वर्गणी सुद्धा गोळा करण्यात आली होती. शिवाय गावातील सामाईक जंगल तोडीसाठी देऊन आवश्यक निधी संकलन करण्यात आल होत. आता जवळपास 55 वर्षांचा काळ लोटल्यावर आताच्या कमिटीने सुमारे 2 ते 3 कोटी इतक्या रकमेचा आराखडा असलेलं श्री देव नागनाथच्या सुसज्ज मंदिर उभारणीचा संकल्प सोडला आहे.
श्री देव नागनाथ मंदिर उभारणीस सहकार्यासाठी-
देवस्थान स्थानिक सल्लागार समितीचे अकाऊंट डिटेल्स-
बँकेचे नाव - बँक ऑफ इंडिया, शाखा - कोनाळकठ्ठा, ता. दोडामार्ग. IFSC CODE : BKID0001431
खाता क्र. 143110110000231