असा म्हणतत की, कोकणात अभिनय पेरूचो लागना नाय, तो घराघरात उगावता. देव प्रत्येकाक जन्माक घालताना एक कला दिताच. पण ती कला जेची तेका कळाक व्हयी. असोच एक कलाकार आपल्या मातीत जन्माक ईलो. तेंका तेंची कला निसती समाजलीच नाय तर, तेंच्यानी त्या कलेचो अटकेपार झेंडो लावलो.
होय..! बरोबर ओळखल्यात. आपले मालवणी ह्रदयसम्राट बाबुजी बद्दलच बोलतय मी. तेंचो जन्म, नाटका, तेंचे भूमिका, तेंचे एकूण एक शब्द. डायलॉग ह्याबद्दल मालवणी माणसाक वेगळा काय सांगाकच नको. रेंवडी व्हाया, मुंबई व्हाया, रंगभूमी व्हाया वस्त्रहरण करीत करीत फक्त मालवणीच न्हय तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक रसिकजनांच्या ह्रदयाचे सम्राट झाल्यात. कसलोही पाठिंबो नसताना फक्त आणि फक्त प्रामाणिक प्रयत्न, मेहनत, जिद्द, मालवणीवर असलेला जिवापाड प्रेम आणि रेवंडीच्या भद्रकालीची कृपा... हेच्या जोरावरच ते मालवणी नटसम्राट बनले.
भजनाचो पाठचो धरकरी ते मालवणी सम्राट. ह्यो हजारों मैलाचो प्रवास सोपो कसो असात सांगा? पण जो माणूस शुन्यातून आपला अस्तित्व निर्माण करता, तेचा यश दैदीप्यमान असतलाच. ज्या काळात लोका हिंदी, मराठीची दिवानी होत होती. त्या काळात आपल्या मायबोली मालवणीतून सादरीकरण करणा ह्यो वेडेपणाच म्हणाक व्हयो नाय काय.? आणि ह्यो वेडेपणा तोच माणूस करतलो, जेचो मालवणी भाषा ह्यो आत्मा असात. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि मुंबईतल्या मालवणी बिर्हाडात बंदीस्त असलेली ही भाषा फक्त आणि फक्त बाबुजींनीच रंगभूमीवर आणली आणि रंगमंचावर एकहाती सत्तापण गाजवल्यांनी ह्यात वादच नाय. इतक्याच करून थांबले नाय तर स्वत:ची भद्रकाली प्रोडक्शनची निर्मिती पण केली. आणि इतिहास रचवल्यानी..!
"आपल्या ताटातला निरांजन आपनाकच पेटवक व्हया, दुसरो कोण येवन ता पेटवचो नाय..!" ह्या बाबुजींचा वाक्य. आज तेंच्यानी पेटवलेल्या त्या वातीच्या उजेडातच मालवणी भाषेन चार पावला फुढे टाकलीत. निसतो गर्वच नाय तर माज होतो तेंका भाषेचो. अभिमानान सांगत ते कायम. माझ्यासमोर भैय्या येवने, गुजराती येवने, नाय तर मारवाडी येवने. तेच्याबरोबर मी मालवणीतच बोलतलंय. तेका नाय समाजला तर तेच्या नशीबाचो तो. अरे ज्या भाषेमुळे माका लोक ओळखाक लागले, माका मालवणी सम्राट नाव मिळाला, ती भाषा जर ईसारलय तर माझ्यासारखो नतद्रष्ट मीच. माका दोन आवशी एक जन्म दिणारी आवस आणि दुसरी माका जगवणारी आवस म्हणजे मालवणी. काय तो अभिमान.!
'मायझयो' ह्या गाळीक पण गोडी लावणारे हे एकमेव व्यक्ती असतीत. तुमका मी आज पैज लावन सांगतय. तात्यांच्या विनोदाचा अफलातून टायमिंग, बोलण्याची ढब, दिलखुलास सादरीकरण शिकण्यासाठीच त्या वेळचे आघाडीचे नट मुद्दाम परत परत तात्यांची नाटका बघत असतील. हसता - हसता समोरच्याच्या काळजाक हात घालून तेच्या डोक्यात आपला म्हणणा पटवणा तेंका बरोब्बर जमला होता. नाटक म्हणजे फक्त मनोरंजन न्हय तर समाजप्रबोधन तितक्याच महत्त्वाचा ह्या तेंच्या प्रत्येक नटकातून कळता. कमालीची दूरदृष्टी ही प्रत्येक नाटकातून दिसून येताच. वटवृक्षासारख्या त्यांनी अख्या मालवणी जग व्यापल्यानी. पण तेव्हाच मुळा मात्र तितकीच घट्ट जमिनीत रोवल्यानी. न्हान मोठा न बघता परतेकाक जीव लावल्यानी. म्हणतत ना, जो सगळ्यांका आवडता तोच देवाक आवडता. कदाचित देवाक पण तुमचो अभिनय लाईव्ह बघूची इच्छा झाली असातलीच. तुम्ही गेल्यापासून सगळोच सावळो गोंधळ चालू आसा ओ. तात्यानू...तो गोप्या खर्या अर्थान पोरको झालो हा. तेका तुमच्या स्टाईलमध्ये कोण पडदोच उघडूकच सांगत नाय.
चाकरमान्यांचे कान धरून सांगाचा आसा तेंका. जरा गावाकडे वळा म्हणान. भैय्यापण हातपाय पसरूक लागलेत मुंबईत. तो बाबलो गावकार नाय तर गावात काय राम रवलो नाय. च्यामारी टोपी तो आबलो गुरव आणि बाबलो घाडी शेफारलेत ओ तेंका मायझये म्हणान गाळी नाय कोणी घातले खूप दिसं. गावात नाटक बसवक आता कोण फुढाकरच घेत नाय. तुम्ही नाय तर.
आवशीच्यान सांगतय तात्यानू आजून आठवणीं बरोबर डोळ्यातसून व्हवतात ओ तुम्ही. डिसेंबर मधली गजाल आसा. मालवणीचो प्रोग्राम झालो होतो शिवाजी मंदीरमध्ये. दुसर्या दिवशी थय गेलंय होतय. तर थयचे व्दारपाल भेटले. आणि डोळ्यात पाणी आणून बोल्ले... खूप दिवसांनी मालवणी प्रोग्राम बघलंय काल. माका बाबुजींची आठवण ईली. आणि एक खंत पण व्यक्त केल्यानी. बाबुजी असताना जशी मालवणी नाटका होत होती, तशी आता नाय.
जानेवारीमध्ये माघी गणपतीच्या निमित्ताने तुमच्या मुळ गावी, तुम्ही ज्या रंगमंचावरून सुरवात केलीत, त्या रंगमंचावर सादरीकरण करूची संधी मिळाली ओ माका. नाय सांगु शकनय तो आनंद शब्दात. तुमच्या गावात दोन दिवस होतय रवाक. थय येणारो प्रत्येक माणूस दर्शनासाठी देवीच्या येत होतो, पण भरभरून बोलत मात्र बाबुजींबद्दल होतो. तुम्ही एक वेगळीच जागा मिळवलीहा माणसांच्या मनात. रेंवडी गाव कलाकरांचा गाव म्हणश्यात तर ती अतिशयोक्ती अज्जिबात नाय होवची. आपल्या लाडक्या बाबुजींचो आदर्श डोळ्यासमोर ठेवन तुमच्या गावतले बहुतेक लोक खूप यशस्वी झालेत ह्या क्षेत्रात. 'बाबुजी माफ करा, मी मान्य करतंय की, मैलाचो दगड असलेला बोलीभाषेतला उत्कृष्ट नाटक 'वस्त्रहरण' मी अजुन लाईव्ह नाय बघलंय... म्हणजे तसो योग नाय ईलो. पण अभिमानान सांगतय तात्यांनू... जा स्वप्न तुम्ही मालवणीसाठी बघलात, ता स्वप्न पूर्ण करूक मी माझा योगदान दियत आसय आणि कायम दियत रवतलंय.
तर गाववांल्यानू बाबुजींनी मालवणी बोली भाषेच्या प्रसारासाठी ही जी दिडींची मुहूर्तमेढ रोवली, त्या दिडींचे वारकरी होवया. मालवणी गाजवया, अभिमानान मिरवया आणि ही तेंच्यानी रोवलेली मालवणी पताका. अशीच उंच उंच फडकवत ठेवया. तेंका ह्यापेक्षा मोठी आदरांजली ती काय आसात? मालवणी जगा ! मालवणी बोला !! मालवणी वाढवा.!!!
- अर्चना परब