KOKAN FESTIVAL | गणपतीची माटी का बांधली जाते?

कोकणची समृद्ध परंपरा
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: August 30, 2022 09:22 AM
views 679  views

माटी हे कोकणच्या समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. गणपतीच्या आसनाच्या वर माटी बांधण्यात येते. यामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींची फळे, पाने, फुले बांधली जातात. हे बांधण्यासाठी लाकडाची #माटी वापरली जाते. जी साधारण आयताकृती असते आणि त्यात उभ्या-आडव्या पट्ट्या असतात.
कोकण हे विविध वनस्पतींनी नटलेले आहे. आणि त्यात श्रावण-भाद्रपद महिन्यात येणार्‍या बहाराने ते अजून नटून जाते. माटी बांधण्याचा धार्मिक उद्देश म्हणजे, ही पृथ्वी म्हणजे साक्षात श्री देवी पार्वतीचे रुप आहे आणि ती गणेशाच्या आगमनासाठी विविध वनस्पतींच्या रुपांनी नटली आहे. त्यामुळे याच काळात बहरणाऱ्या वनस्पतींचा वापर माटीमध्ये केला जातो.

माटीमधील सर्वात आवश्यक गोष्टी म्हणजे आंब्याचे टाळ, किवनीचे दोर, उतरलेला नारळ, शिप्टा आणि तवसा.

1) आंब्याचे टाळे :- आंबा
Mangifera indica (Anacardiaceae)
माटीमधील सर्वात महत्वाचे झाड म्हणजे आंबा. कोकणात बऱ्याच पवित्र कार्यात आंब्याचे टाळे म्हणजे फांद्यांची डहाळे वापरले जातात. हे टाळे फक्त आंबोलीचेच (रायवळ आंबा) असले पाहिजेत. गारपाच्या (कलमी) आंब्याच्या टाळ्यांचा वापर होत नाही.

2) केवणीचे दोर (किवनीचे दोर) :- केवण / मुरडशेंग
Helicteris isora (Malvaceae)
आंब्याचे टाळे किंवा इतर गोष्टी माटीला बांधण्यासाठी केवणीच्या झाडाच्या सालीचे दोर वापरतात. ही साल खुप मजबूत असते त्यामुळे तीचा वापर केला जातो. केवण हे एक झुडूप आहे. त्याला लाल फुले व पिळदार शेंगा येतात. केवणीच्या शेंगांना मुरडशेंग म्हटले जाते. मुरडशेंग ही लहान मुलांच्या औषधी #सानशी तील एक आहे.

3) उतरलेला नारळ :- नारळ / माड
Cocos nucifera (Arecaceae)
माटीमधील महत्वाचे फळ म्हणजे नारळ. खास माटीसाठी झाडावरून न पाडता तर उतरलेला नारळ वापरला जातो.

4) शिप्टा (कातरो) :- सुपारी / फोफळ
Areca catechu (Arecaceae)
शिप्टा म्हणजे सुपारीच्या फळांचे घोस. यांचाही वापर माटीत प्रामुख्याने होतो.

5) तवसा (काकडी) :- काकडी
Cucumis sativus (Cucurbitaceae)
काकडी ही पावसाळ्यात उगवणाऱ्या भाजांपैकी एक व त्यामुळे माटीत काकडी (तवसा) चा समावेश असतो. तसेच याशिवाय प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार व उपलब्धतेनुसार विविध इतर फळेही माटीला बांधतात. गणेश विसर्जनावेळी नारळ व काकडी कापून प्रसाद म्हणून वाटली जाते.

यांशिवाय माटी रंगीत व आकर्षक दिसावी म्हणून आजुबाजुला उपलब्ध असलेल्या इतर जंगली वनस्पतीही माटीत वापरल्या जातात. यात हरण, कवंडळ, कांगणे, सरवड, आयना, तेरडा, वाघनखी, नरमाची फळे व नागकुड्याची फळे यांचा समावेश होतो.

6) हरण (हराण) :- सोनकी
Senecio bombayensis (Asteraceae)
सोनकी हे एक लहान रोपट असते. त्याला आकर्षण पिवळी फुले येतात. पावसाळ्यात कोकणातील सडे हरणाने भरुन जातात. माटीमध्ये हरण प्रामुख्याने बांधले जाते.

7) कवंडळ (कौंडाळ) :- कवंडळ