भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘क्वांटेक्झेरा 2026’ उत्साहात

Edited by: विनायक गांवस
Published on: March 30, 2026 17:43 PM
views 11  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित ‘क्वांटेक्झेरा 2026’ हा टेक फेस्ट मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात विविध तांत्रिक व सर्जनशील स्पर्धांसोबतच ऑटो शोमधून वेग, ताकद आणि नाविन्यपूर्ण अभियांत्रिकीचा थरार अनुभवायला मिळाला. पहिल्या दिवशी टू-व्हीलर, तर दुसऱ्या दिवशी फोर-व्हीलर वाहनांनी मैदानावर विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली. सहभागी वाहनांमधून इंजिनची कार्यक्षमता, पॉवर डिलिव्हरी, स्टॅबिलिटी कंट्रोल तसेच वाहनांमध्ये करण्यात आलेले नाविन्यपूर्ण तांत्रिक बदल प्रभावीपणे मांडण्यात आले. या वाहनांच्या थरारक सादरीकरणांनी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी खेचून घेतली.

आयोजित स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपली कौशल्ये सादर केली. डिबेट स्पर्धेत वालचंद कॉलेजच्या व्यंकटेश यशवंत यांने प्रथम तर भोसले इन्स्टिट्यूटच्या वेदांग सावंत आणि प्रथमेश भिके यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. हॅकॅथॉन स्पर्धेत वेर्णा येथील पीसीसीई कॉलेजच्या प्रशांत गवंडळकर व टीमने प्रथम तर त्याच कॉलेजच्या गीतेश नाईक व टीमने द्वितीय आणि भोसले इन्स्टिट्यूटच्या तेजस पाटील व टीमने तृतीय क्रमांक पटकावला. रोबो रेस स्पर्धेत एआयटीडी गोवाच्या सगुण सावंत व रुद्र मकवान यांनी प्रथम, एसआयटीएस पुणेच्या झेनिथ पारटे व टीमने द्वितीय आणि अशोकराव माने कॉलेजच्या सनी कुंभार व टीमने तृतीय क्रमांक मिळविला. प्रोजेक्ट स्पर्धेत भोसले इन्स्टिटयूटच्या पूजा सरमळकरने प्रथम, वेर्णा पॉलिटेक्निकच्या संदेश व टीमने द्वितीय तर व्हीवा कॉलेज मुंबईच्या नितेश सिंग व टीमने आणि भोसले इन्स्टिट्यूटच्या रितेश गवस यांनी तृतीय क्रमांक मिळवला. ब्लाइंड सी कोडिंग स्पर्धेत भोसले इन्स्टिट्यूटच्या ज्योती नाटलेकर व वृंदा गावडे यांनी प्रथम तर गौरी सावंत व अपूर्वा सावंत यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. रील मेकिंग स्पर्धेत गणेश खडपकर याने प्रथम तर आदित्य धुरी याने द्वितीय क्रमांक मिळवला. फोटोग्राफी स्पर्धेत चिन्मय नाईक प्रथम व अनुराधा साळवी द्वितीय ठरले.

दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाचा समारोप अतिशय दिमाखात करण्यात आला. बक्षीस वितरण श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा व प्राचार्य डॉ. रमण बाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विजेत्यांना आकर्षक चषक, प्रमाणपत्रे आणि रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली.