खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खुल्या कबड्डी स्पर्धा

स्वरेया फाउंडेशनचे आयोजन
Edited by: दिपेश परब
Published on: March 30, 2026 17:48 PM
views 45  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग - रत्नागिरी मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वरेया फाउंडेशन पुरस्कृत, महाराष्ट्र राज्य व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन च्या मान्यतेने वेंगुर्ला तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने, जय मानसीश्वर कबड्डी संघ आयोजित सिंधुदुर्ग व रत्नागिरी मर्यादित निमंत्रित संघांची "खुली कबड्डी स्पर्धा" आयोजित करण्यात आलेली. 

 १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येणारी  "सिंधूरत्न भूषण चषक २०२६" ही कबड्डी स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. महिला गटात विजेत्या संघास रोख २० हजार, उपविजेत्या संघास १० हजार तसेच उपांत्य सामन्यात पराभूत दोन्ही संघास प्रत्येकी ३ हजार रुपये व सर्व विजेत्या संघाना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. 

तसेच पुरुष गटात विजेत्या संघास ३० हजार, उपविजेत्या संघास १५ हजार व उपांत्य सामन्यात पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी ५ हजार व सर्व विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत इतर वैयक्तिक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. वेंगुर्ले येथील बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय मैदान येथे  ही स्पर्धा सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत घेण्यात येईल. तरी अधिक माहितीसाठी पंकज शिरसाठ (9673563223) व हेमंत गावडे (9421235128) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.