
देवगड : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली . दिनांक 28 सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, जिल्हा परिषद सदस्य सौ.सावी लोके,देवदत्त कदम,शिरगाव पंचायत समिती सदस्य शितल तावडे,तळवडे पंचायत समिती सदस्य सौ.सलोनी तळवडेकर यांच्या सह मिलिंद साटम ,शेतकरी संतोष तावडे, उमेश घाडी ,कृषी मंडल अधिकारी लांबडे ,कृषी सहाय्यक उपस्थित होते .
यावेळी शिरगांव परिसरातील शेतावर शेतीची नुकसानी पाहणी करण्यात आली. तात्काळ सर्वांचे पंचनामे करण्यासाठी उपस्थित असलेले कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांना सूचना केल्या. तसेच सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सरसकट मदत कशी मिळेल या साठी सर्व प्रशासकीय यंत्रणानी काम करावे अशा सूचना जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांनी केल्या.












