
कुडाळ : पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आनंद शांताराम सावंत (वय ६९) यांचे काल रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गोवा येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
सावंत यांचे मूळ गाव वसोली असून, गेल्या काही वर्षांपासून ते झाराप येथे स्थायिक झाले होते. तिलारी आणि टाळंबा पाटबंधारे प्रकल्पांमध्ये त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता झाराप येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.












