LIVE UPDATES

कणकवली कॉलेजमध्ये योग प्रशिक्षण शिबिर उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 26, 2026 12:50 PM
views 7  views

कणकवली : कणकवली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एकदिवसीय योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या एचपीसीएल हॉल येथे सकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात महाविद्यालयातील ६५ विद्यार्थी, स्वयंसेवक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 

योगाभ्यास, प्राणायाम तसेच योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरासाठी पतंजली योग समितीचे डॉ. रावराणे सर व श्री. कोचरेकर यांनी योग प्रशिक्षण देत उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यांनी नियमित योगाभ्यासाचे आरोग्यदायी फायदेही स्पष्ट केले. यावेळी प्राचार्य युवराज महालिंगे यांनीही मार्गदर्शन केले.