
देवगड : श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे जागतिक ध्यान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मेडिटेशन मास्टर शेखर कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी सर्वानी सामूहिक ध्यान साधना केली.
ध्यानाचे महत्त्व सांगताना मानसिक आरोग्य, तणावमुक्त जीवन, एकाग्रता वाढ आणि सकारात्मक विचारांची जोपासना यावर मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात ध्यानाचा अवलंब केल्यास कामातील कार्यक्षमता वाढते, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात उपस्थितांनी नियमित ध्यान करण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये शांतता, सकारात्मकता व कामाविषयी उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी व्यासपिठावर चारुदत्त सोमण, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, श्रुती पाटणकर आदी मान्यवर उपस्थिती होते. तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी केले.











