
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डिप्लोमा विभागाच्या ३५ विद्यार्थ्यांची सिप्ला या आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये निवड झाली आहे. कॉलेजच्या वतीने सीझन्स फर्स्ट ड्राइव्ह अंतर्गत कॅम्पस मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. यात मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या एकूण ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यापैकी ३५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. या कॅम्पस ड्राइव्हच्या उद्घाटनप्रसंगी उपप्राचार्य गजानन भोसले, सिप्ला एचआर टीम, ट्रेनिंग व प्लेसमेंट हेड मिलिंद देसाई, इलेक्ट्रिकल विभागप्रमुख हर्षल पवार,मेकॅनिकल विभागप्रमुख अभिषेक राणे व महेश पाटील उपस्थित होते. ही निवड विद्यार्थ्यांच्या मेहनतीसह संस्थेतील दर्जेदार शिक्षण व मार्गदर्शनाचे फलित असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील संधी, कौशल्यविकासाचे महत्त्व आणि व्यावसायिक शिस्त याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी अभिनंदन केले.











