
सावंतवाडी : अल्पवयीन मुलीची छेड काढली म्हणून सुनील उर्फ सनी बाळू पाटील वय .38 रा. सावंतवाडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी घरातून पळून गेल्याने त्याचा शहरात विविध ठिकाणी शोध घेऊन रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सावंतवाडी शहरात ही घटना घडली असून अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी सुनील उर्फ सनी बाळू पाटील वय .38 रा. सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे. काल रात्री त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.














