कोकणसाद LIVEचा IMPACT

वेताळ बांबर्डे पुलाचे काम अखेर सुरू
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: May 13, 2026 13:30 PM
views 149  views

कुडाळ : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही ओरोस बुद्रुक ते कुडाळ महामार्गावरील कामे रखडल्याबाबतचे वृत्त कोकणसाद LIVEने प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली आहे. या बातमीचा मोठा 'इम्पॅक्ट' पाहायला मिळाला असून, ठेकेदाराने काल बातमी प्रदर्शित होताच वेताळ बांबर्डे पूल नजीक रखडलेले अर्धवट काम तातडीने सुरू केले आहे.

यंत्रणा अखेर कामाला लागली

गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावरील देखभाल-दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते. वेताळ बांबर्डे भागातील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि पुलाशेजारील धोकादायक वळणाचे काम अर्धवट असल्याने पावसाळ्यात प्रवाशांचा जीव टांगणीला लागणार होता. मात्र, 'कोकणसाद LIVE'ने या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर, ठेकेदाराने उशिरा का होईना पण कामाला सुरुवात केली आहे.

वेताळ बांबर्डे पूल नजीकचे वळण अत्यंत धोकादायक बनले होते. या वळणावर आजपर्यंत दोन वाहनांचे अपघात झाले होते. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची आशा पल्लवित झाली आहे. दर्जेदार काम व्हावे, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.