धाटाव औद्योगिक वसाहती मध्ये कामगारांचा पुन्हा प्रश्न...?

युनिकेम कंपनीचा स्थानिक कामगारांना डावळण्याचा प्रयत्न..?
Edited by: रुपेश रटाटे
Published on: May 13, 2026 15:57 PM
views 20  views

रायगड : धाटाव औद्योगिक वसाहती मध्ये वारंवार कामगारांच्या मानसिकतेची परीक्षा घेतली जात आहे. युनिकेम कंपनी मधील स्थानिक भूमिपुत्रांसहित  15 कामगारांचा ट्रेनिग कालावधी समाप्त होऊन देखील कायम स्वरूपी कामावर घेतले जात नाही. भाबडी अश्या मनात धरून कामगार सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी कंपनीच्या सर्व बाबी मान्य करत कामावरून रुजू होतात. मात्र कंपनी नी व्यवस्थापनाने  कामगारांना योग्य न्याय देणे गरजेचे आहे. गेली तीन ते पाच च वर्ष ट्रेनिंग योजनेत राबवून  थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट  मध्ये काम करण्यास आत्ता सांगितले आहे. याच गोष्टीचा त्रिव्र विरोध  म्हूणन स्थानिक गावकऱ्यांकडून विरोध करण्यात आला आहे. आधीच धाटाव एम आय  डी सि मध्ये कामगारांच्या सुरक्षितेचे आधीच तीन तेरा वाजले आहेत त्या मुळे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून धाटाव एमआयडीसी भयावह चित्र आहे. या सर्व गोष्टी सहन करून देखील कामगार जीव मुठीत घेऊन रोजनदारीवर काम करत आहे. मनात एकच अशा घेऊन की, कंपनी व्यवस्थापन भविष्यात आपला विचार करून कायमस्वरूपी कामावरून घेईल, मात्र याचं गोष्टीला कंटाळून आत्ता युनिकेम कंपनी विरोधात स्थनिक भूमिपुत्रांनी आता कडकडीत विरोध दर्शवला आहे. आधीच पगार वाढी साठी शेजारी असलेल्या अंशुल  कंपनीच्या कामगारांनी संपाची हाक दिले.त्यात आणखी भर युनिकेम कंपनी च्या आरमुटे धोरणामुळे कामगारांचा कडकडीत विरोध.त्या मुळे कंपनी व्यवस्थापन कोणता पवित्रा घेते..? कि गेली तीन ते पाच वर्ष काम करीत असेलेल्या कामगारांच्या विरोधाला केराची टोपली दाखवते हे देखील समोर येईल..?कामगार टिकला तर कारखाना टिकेल या सर्व बाबी कंपनी व्यवस्थापन किती गांभीर्याने  घेते...? हे देखील लवकरच समोर येईल.