अपघाताच्या पार्श्वभूमीवर राकेश पवार यांनी आरटीओसह पोलिसांचे वेधले लक्ष

Edited by: विनायक गांवस
Published on: May 13, 2026 16:17 PM
views 225  views

सावंतवाडी : वेंगुर्ला-बेळगाव रस्त्यावरून कोलगावमार्गे अनेक मोठे ट्रक भरधाव वेगाने जातात. यामुळे नूकताच एक अपघात गावात घडला.  या पार्श्वभूमीवर शिवसेना उप तालुकाप्रमुख राकेश पवार यांनी आरटीओसह पोलिसांचे लक्ष वेधले आहे. 

ते म्हणाले, काही वेळ मद्यधुंद अवस्थेत ट्रक व डंपर चालक येथून जातात. त्यांच्यावर बंधन येण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. कोलगाव येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी अशी मागणी श्री. पवार यांनी केली आहे. वेंगुर्ला-बेळगाव रस्त्यावरून कोलगावमार्गे मोठ्या प्रमाणात ही रहदारी होते. त्यामुळे कोलगाव तिठा ते बुर्डीपूल‌ भागात पोलिसांकडून योग्यती खबरदारी घेण्यात यावी असंही ते म्हणाले आहेत.